राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद - भारतीय संविधान रक्षणासाठी १० महत्त्वाचे ठराव संमत!

राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद - भारतीय संविधान रक्षणासाठी १० महत्त्वाचे ठराव संमत!

संविधान जागरूकतेसाठी राज्यभरात अभियान राबवले जाणार!

 "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समाजावर अनंत उपकार आहेत.मी आज त्यांच्या विचारांमुळे मंत्री झालो आहे." :- पालकमंत्री गुलाबराव पाटील.

एरंडोल :- जळगाव भारतीय संविधानाची मूल्यव्यवस्था लाथाडली जात असल्याची खंत व्यक्त करत डॉ. अनंत राऊत यांनी राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेत संविधानाचे रक्षण करण्यासाठी ठोस भूमिका घेतली. एरंडोल येथे आयोजित या भव्य परिषदेत २,००० हून अधिक संविधानप्रेमींनी सहभाग घेतला.

संविधान बचावासाठी प्रमुख मागण्या...

परिषदेत संविधानाच्या रक्षणासाठी १० महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले, त्यात भारतीय संविधानाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करणे, संविधानाच्या अभ्यासक्रमात समावेश करणे, तसेच संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. 

कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये...

✅ संविधान बाईक रॅली: बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून संविधान जागरूकतेसाठी भव्य रॅली काढण्यात आली.

✅ ग्रंथ प्रदर्शन व विक्री: संविधानविषयक ग्रंथांची विक्रमी खरेदी.

✅ संविधानावर परिसंवाद: स्त्री-पुरुष समानता, सामाजिक समता आणि आर्थिक न्यायावर तज्ज्ञांचे विचारमंथन.

✅ संविधान कवी संमेलन: २७ कवींनी कविता सादर करत संविधान जागरूकतेचा संदेश दिला.

✅ संविधान लढा चेतना पुरस्कार: संविधान प्रचार व संवर्धन करणाऱ्या व्यक्तींचा गौरव.

परिषदेमध्ये संमत १० ठराव...

1️⃣ भारतीय संविधानाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून अधिकृत मान्यता मिळावी.

2️⃣ संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.

3️⃣ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान शिल्पकार म्हणून अधिकृत मान्यता द्यावी.

4️⃣ संविधान मूल्ये रुजवण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्यात.

5️⃣ शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात संविधानाचा समावेश करावा.

6️⃣ न्यायालयांमध्ये संविधान साक्षीने शपथ घेण्याची पद्धत सुरू करावी.

7️⃣ संविधान सन्मानासाठी कायदेशीर तरतूद करावी.

8️⃣ संविधान प्रचार करणाऱ्या संस्थांना शासकीय अनुदान द्यावे.

9️⃣ संविधान विरोधी कृती करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी.

🔟 सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविकेचे वाचन अनिवार्य करावे.

 प्रमुख मान्यवरांचे विचार...

डॉ. अनंत राऊत: "संविधानावर संकट आहे. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी संविधानाच्या संरक्षणासाठी पुढे यावे!"

डॉ. प्रदीप आगलावे: "शाळा-महाविद्यालयांमध्ये संविधानाचा समावेश करून संविधान साक्षरता वाढवली पाहिजे."


Post a Comment

Previous Post Next Post