भव्य वंधत्व निवारण शिबिर – ३१ जोडप्यांना मोफत तपासणी आणि तज्ज्ञ मार्गदर्शन.

भव्य वंधत्व निवारण शिबिर – ३१ जोडप्यांना मोफत तपासणी आणि तज्ज्ञ मार्गदर्शन.

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त एरंडोलमध्ये विशेष आरोग्य उपक्रम.
भव्य वंधत्व निवारण शिबिर – ३१ जोडप्यांना मोफत तपासणी आणि तज्ज्ञ मार्गदर्शन.

एरंडोल:- १६ मार्च २०२५ – वंधत्वावर प्रभावी उपचार आणि जनजागृतीसाठी एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशन, आई हॉस्पिटल आणि प्रसिद्ध आय.व्ही.एफ. तज्ज्ञ डॉ. कविता दराडे (येवला) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वंधत्व निवारण शिबिर आयोजित करण्यात आले.

मोफत तपासणी आणि वंधत्वावरील आधुनिक उपाय..

शिबिरात ३१ जोडप्यांची सोनोग्राफी व सिमेन अॅनालिसिस यासारख्या महत्त्वपूर्ण तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच, डॉ. कविता दराडे यांनी वंधत्वावरील अत्याधुनिक उपचार आणि उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन केले.

उद्घाटन व मान्यवर उपस्थिती.

Seo

शिबिराचे उद्घाटन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर काबरा आणि माजी उपनगराध्यक्ष डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. राहुल वाघ, डॉ. किरण पाटील, डॉ. आर. टी. पाटील, डॉ. अमोल बोरणारकर पी आर ओ शेखर बुंदले यांच्यासह तालुक्यातील नामवंत डॉक्टर्स उपस्थित होते.

विशेष व्याख्यान आणि स्नेहभोजन.

शिबिरानंतर रात्री "न्यू अॅप्रोच इन इन्फर्टिलिटी" या विषयावर डॉ. कविता दराडे यांचे व्याख्यान हॉटेल कृष्णा इन येथे आयोजित करण्यात आले. यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष योगदान.

या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. राहुल वाघ, डॉ. सुधीर काबरा, डॉ. किरण पाटील आणि शेखर बुंदेले यांनी विशेष मेहनत घेतली.

महिला आरोग्यासाठी महत्त्वाचा टप्पा.

वंधत्वासंबंधी योग्य निदान आणि उपचार मिळाल्यास अनेक कुटुंबांचे स्वप्न साकार होऊ शकते. या शिबिरामुळे वंधत्वाविषयीची जनजागृती वाढली असून भविष्यात असे आरोग्य उपक्रम अधिकाधिक होण्याची अपेक्षा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post