श्री जितेंद्र पाटील यांना "आरोग्यदूत सेवारत्न पुरस्कार" जाहीर – आरोग्य क्षेत्रातील योगदानाची मोठी दखल!

पुणे, ७ मार्च २०२५ – आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन चे अध्यक्ष श्री जितेंद्र केवलसिंग पाटील यांना शिवशंभु संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे "आरोग्यदूत सेवारत्न पुरस्कार" जाहीर करण्यात आला आहे.

श्री जितेंद्र पाटील यांना "आरोग्यदूत सेवारत्न पुरस्कार" जाहीर – आरोग्य क्षेत्रातील योगदानाची मोठी दखल!

हा पुरस्कार शुक्रवार, ७ मार्च २०२५ रोजी किल्ले तोरणा येथे शिवशंभु संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री महादेव पवार साहेब यांच्या पुढाकाराने प्रदान केला जाणार आहे.

समाजासाठी अहोरात्र कार्यरत असलेले सेवाव्रती

कोरोना महामारीच्या कठीण काळात श्री पाटील यांनी –

✔ मोफत अन्न, धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

✔ रक्तदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन

✔ अल्पदरात रुग्णवाहिका सेवा

✔ अनाथ आणि दिव्यांगांसाठी विशेष उपक्रम

यांसारखी अनेक समाजोपयोगी कार्ये केली. यामुळे समाजातील अनेक गरजूंना दिलासा मिळाला.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता.

त्यांच्या समाजसेवेसाठी ५ आंतरराष्ट्रीय आणि १५० राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यामुळे "आरोग्यदूत सेवारत्न" पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

श्री जितेंद्र पाटील यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!


 

Post a Comment

Previous Post Next Post