संविधान जागृतीसाठी भव्य उपक्रम – परिसंवाद, पुरस्कार वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश.
एरंडोल, जळगाव – राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन रविवार, १६ मार्च रोजी हॉटेल कृष्णा मैदान, एरंडोल येथे होणार आहे. या ऐतिहासिक परिषदेला नांदेड येथील संविधान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. अनंत राऊत अध्यक्षस्थान भूषवणार असून, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर उद्घाटन करणार आहेत.
संविधान जागरासाठी भव्य कार्यक्रमांचे आयोजन.
या परिषदेत संविधानाच्या अंमलबजावणीची दशा आणि दिशा या विषयावर डॉ. प्रदीप आगलावे यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. संविधान लढा चेतना पुरस्कार वितरण, संविधान चित्र प्रदर्शनी, परिसंवाद, कवी संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम या परिषदेला विशेष स्वरूप देणार आहेत.
राज्यभरातून विचारवंत, साहित्यिक आणि अभ्यासकांची उपस्थिती.
या कार्यक्रमात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार अमोल पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार अनिल पाटील,आमदार किशोर पाटील,आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
संविधान परिसंवाद आणि कवी संमेलनाचे विशेष आकर्षण.
परिषदेत तीन परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून, भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता, सामाजिक व आर्थिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि व्यक्ती स्वातंत्र्य या विषयांवर मान्यवर विचार मांडणार आहेत. सायंकाळी संविधान कवी संमेलन होणार असून, राज्यभरातील ३० हून अधिक कवी सहभागी होणार आहेत.
संविधान चळवळीचा जागर – तीन हजारांहून अधिक उपस्थिती अपेक्षित...
या परिषदेसाठी ४० हून अधिक बैठका पार पडल्या असून, तीन हजारांहून अधिक लोकांचा सहभाग अपेक्षित आहे. खानदेशातील पहिलीच राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद असल्याने ती ऐतिहासिक ठरणार असल्याचे संयोजक प्रा. भरत शिरसाट यांनी सांगितले.
संविधान सन्मान परिषदेचे ठळक आकर्षण.
✔ संविधान रॅलीचे आयोजन – सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरुवात
✔ संविधान लढा चेतना पुरस्कार वितरण – संविधानासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मान
✔ संविधान परिसंवाद आणि चर्चा सत्रे – संविधान तज्ज्ञांचे मार्गदर्शन
✔ संविधान कवी संमेलन – राज्यभरातील ३० हून अधिक कवींचा सहभाग
✔ संविधान मूल्ये जनजागृती संघाची स्थापना – संविधान प्रचार आणि प्रसारासाठी महत्त्वाचा उपक्रम
या भव्य परिषदेमुळे संविधानाबद्दल जागृती निर्माण होऊन, नव्या पिढीला संविधानाच्या मूल्यांची जाणीव होणार आहे. खानदेशात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम होणार असल्याने संविधान प्रेमींमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.
Post a Comment