एरंडोल:- वकिल संघाने पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात मृत पावलेल्या भारतीय नागरिकांना आणि शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमात उपस्थित वकील सदस्यांनी एकत्र येऊन शहीदांच्या बलिदानाला मान दिला.
एरंडोल न्यायालयात आयोजित केलेल्या या श्रद्धांजली कार्यक्रमात वकिलांनी शहीदांच्या कुटुंबीयांना सहानुभूती व्यक्त केली आणि त्यांच्या शौर्याची प्रशंसा केली. वकिलसंघाचे अध्यक्ष यांनी या हल्ल्याच्या निषेधात आवाज उठवला आणि देशाच्या सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
या घटनेने संपूर्ण देशात शोककळा पसरली असून, सर्वांनी एकत्र येऊन शहीदांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची गरज असल्याचे वकिलांनी सांगितले.
Post a Comment