एरंडोल (प्रतिनिधी) –स्वच्छ भारत अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल एरंडोल नगरपरिषदेला जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने "सन्मानपत्र" प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.अमोल बागुल यांना हा सन्मान देण्यात आला.
उत्कृष्ट अधिकारी म्हणून स्वच्छता निरीक्षक जिवन जाधव तसेच आरोग्य निरीक्षक अनिल महाजन,समन्वयक विवेक कोळी यांना देखील सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
तसेच मा.मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील,आमदार किशोर पाटील हे ही व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रशासक तथा मुख्याधिकारी अमोल बागुल साहेब यांच्या मार्गदर्शनमुळे शक्य झाल्याचे स्वच्छता निरीक्षक श्री. जीवन जाधव यांनी नमूद केले. तसेच नगरपरिषद कर्मचारी आणि स्वच्छता दूतांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
स्वच्छ भारत अभियानात सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे एरंडोल नगरपरिषद राज्यस्तरावर उजळून आली असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे.
Post a Comment