कलश यात्रेसह एरंडोलमध्ये राष्ट्रवादीचा शक्तिप्रदर्शन सोहळा; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सामूहिक प्रवेश.

कलश यात्रेसह एरंडोलमध्ये राष्ट्रवादीचा शक्तिप्रदर्शन सोहळा; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सामूहिक प्रवेश.

राजूभाऊ चौधरी यांची एरंडोल तालुका किसान सेल प्रमुखपदी निवड.


एरंडोल:
- २७एप्रिल २०२५– महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित "महाराष्ट्र मंगल कलश यात्रा"चा भव्य स्वागत सोहळा एरंडोल येथे उत्साहात पार पडला. या यात्रेचे स्वागत डॉक्टर दादासाहेब सुरेश पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अमित दादा पाटील यांच्यासह शहर, तालुका आणि जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोषात करण्यात आले.

ही यात्रा २७ एप्रिल रोजी मुक्ताईनगर येथून प्रारंभ झाली असून, ती महाराष्ट्राच्या सामाजिक,सांस्कृतिक आणि राजकीय मूल्यांचे दर्शन घडवत आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगून ही यात्रा विविध गावांमधून जनतेपर्यंत पोहोचत आहे.

कलश यात्रेसह एरंडोलमध्ये राष्ट्रवादीचा शक्तिप्रदर्शन सोहळा; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सामूहिक प्रवेश.

या कार्यक्रमात विशेष म्हणजे, एरंडोल तालुका व शहरातील काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. हे प्रवेश माजी मंत्री व आमदार अनिल दादा पाटील, जिल्हाध्यक्ष संजय दादा पवार, डॉक्टर सुरेश दादा पाटील, तालुकाध्यक्ष अमित दादा पाटील, भाऊसाहेब योगेश देसले, किसान सेल जिल्हाप्रमुख ईश्वर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

प्रवेश करणारे काही प्रमुख पदाधिकारी:

राजेंद्र रामदास चौधरी (एरंडोल)

दीपक लक्ष्मण पाटील (कासोदा)

शेख कलीम शेख सलीम (एरंडोल)

कैलास नाईक

मुकुंद यादव ठाकूर (विखरण)

जगदीश लक्ष्मण पाटील (मालखेडा)

मनोज शांताराम पाटील (रिंगणगाव)

शेख नुरा शेख मोहम्मद (एरंडोल)

सत्तार खान, अकबर खान (एरंडोल)

या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते: माजी मंत्री अनिल दादा पाटील, जिल्हाध्यक्ष संजय दादा पवार, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, रावेर ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिलाषा रोकडे, ज्ञानेश्वर महाजन, ईश्वर दादा पाटील, किशोर पाटील (खर्ची) इत्यादी.

कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वी नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस एरंडोल शहर व तालुका युनिटच्या वतीने करण्यात आले. हा सोहळा पक्षाच्या वाढत्या लोकसंग्रहाचे आणि बळकट होत असलेल्या संघटनेचे प्रतिक ठरला.


 




Post a Comment

Previous Post Next Post