![]() |
विद्यार्थ्यांसमवेत प्राध्यापक वर्ग – ज्ञानसोहळ्याचे साक्षीदार.
एरंडोल :-शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पळासदळ येथे 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ‘पुस्तक’ या शब्दातच ज्ञान, सृजन आणि समृद्धीची बीजं दडलेली आहेत. हेच अधोरेखित करत उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी "पुस्तक हेच खरं मार्गदर्शक आहे," असे सांगत उपस्थितांना प्रेरणा दिली. |
कार्यक्रमात ज्येष्ठ प्राध्यापक जावेद शेख, करण पावरा, मंगेश पाटील, राहुल अहिरे, दिग्विजय पाटील, सुमेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त होता.
ग्रंथपाल मीना मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर व्यवस्थापनाचे प्रतिनिधित्व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री आणि सचिव सौ. रूपा शास्त्री यांनी केलं. या सांस्कृतिक सोहळ्याला महाविद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
ज्ञानाचा उत्सव ठरलेला हा दिवस, वाचन संस्कृतीच्या नव्या वाटा शोधण्यासाठी प्रेरणादायी ठरला.
Post a Comment