एरंडोल – शहरासह ग्रामीण भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
रविवारी पुतळ्याजवळ देशभक्तीपर गीतं व भिमगीतांचा कार्यक्रम झाला. सोमवारी सकाळी शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ झाला. रॅलीत युवकांनी निळ्या ध्वजासह बाबासाहेबांचे छायाचित्र मोटरसायकलवर लावून सहभाग घेतला.
कार्यक्रमास आमदार अमोल पाटील, उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, प्रा. मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. संविधानाची पुस्तके व "संविधानाचे शिल्पकार" हे पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
सायंकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी मिरवणुकीस भेट दिली व पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
उत्सव यशस्वी करण्यासाठी लखन बनसोडे, पंकज चौधरी, नितीन बोरसे, प्रवीण बाविस्कर, मोहन सैंदाणे, अवी सोनवणे, प्रा. भरत शिरसाठ, आकाश अहिरे आदी कार्यकर्त्यांनी योगदान दिले. पंचशील मित्र मंडळ, रमाबाई आंबेडकर मंडळ, ब्लू बॉईज ग्रुप, संभाजी ग्रुप यांचेही सहकार्य लाभले.
शैक्षणिक संस्थांचा सहभाग...
दादासाहेब पाटील महाविद्यालय – राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष अमित पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन.
श्रीमती के.डी.पाटील इंग्लिश स्कूल – शाळेत बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करणारा कार्यक्रम.
रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालय – विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर भाषण करून प्रेरणा दिली.
Post a Comment