जळगावमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांची कारवाई, ४ महिलांची सुटका, दोघांवर गुन्हा दाखल.
जळगाव | प्रतिनिधी: गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील नयनतारा मॉलमधील मसाज पार्लरवर पोलिसांनी कारवाई करत वेश्याव्यवसाय उघडकीस आणला. एलसीबी आणि जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत ४ महिलांची सुटका करण्यात आली असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या एका हरियाणावासियावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईचा तपशील...
गोविंदा रिक्षा स्टॉप जवळील नयनतारा ऑर्किड मॉलमधील दुकान क्रमांक ४०८ मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरु असल्याची माहिती एलसीबीला मिळाल्यानंतर त्यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. संशयित राजू मधुजी जाट (रा. राजस्थान) याने अश्लील सेवा देण्याचं आमिष दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
मुख्य आरोपी आणि गुन्हा...
मालक विक्रम राजपाल धानी (वय २०, रा. हरियाणा) हा या व्यवसायाला प्रोत्साहन देत होता. दोघांविरुद्ध पिटा ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू जाटला अटक करण्यात आली असून महिलांना आशादीप महिला वस्तीगृहात हलवण्यात आले आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी...
या कारवाईमध्ये निरीक्षक अनिल भवारी, सपोनि शितल नाईक, उपनिरीक्षक शरद बागल, महेश घायतळ, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली महाजन व इतर कर्मचारी सहभागी होते.
Post a Comment