"१५५ कोटींच्या निधीची तरतूद –पाणीपुरवठा, रस्ते, वसाहतींच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय."
एरंडोल: एरंडोल नगरपरिषदेच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात शहराच्या विकासासाठी १५५ कोटी ७ लाख रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ८.६८ कोटींचे तांत्रिक अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या निधीतून शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
शहराच्या विकास आराखड्यात पाणीपुरवठा योजना, भूगर्भ नालेसंधारण, गटार सफाई, तसेच नव्या सुशोभीकरण प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय, शहरातील रस्ते, नाली व वसाहतींच्या उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी वाटप करण्यात आले आहे.
मुख्य प्रकल्प व योजनांची रूपरेषा.
1. अमृत योजना व पाणीपुरवठा सुधारणा.
जुन्या पाणीपुरवठा योजनेचा विकास
शहरातील भूगर्भ गटार सांडपाणी व्यवस्थापन
नव्या सुसज्ज जलवाहिन्यांची उभारणी
2. गृहनिर्माण आणि नागरी सुविधा.
प्रभाग निहाय सुधारणा योजना.
स्मार्ट सिटी संकल्पनेअंतर्गत नवीन वसाहतींची उभारणी
तळमजल्यावरील सुधारित जलनियोजन.
3. रस्ते व वाहतूक सुधारणा.
शहरातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रीटचे काम
नव्या वाहतूक व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित आराखडा
4. हरित विकास व सार्वजनिक आरोग्य:
शहरातील बगीच्यांचे सुशोभीकरण.
स्वच्छता मोहीम आणि आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर
कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
प्रशासनाची भूमिका आणि जनतेची अपेक्षा.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी हे प्रकल्प प्रभावी ठरणार आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, गृहनिर्माण आणि वाहतूक सुधारणा यामुळे शहराचा विकास वेगाने होईल.
प्रशासक तथा म. मुख्याधिकारी श्री. अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विनोदकुमार पाटील कार्यालय अधिक्षक, श्री. शरद राजपुत लेखापाल, श्री. कपिल भावसार लेखापरिक्षक, श्री. दगडू मराठे करनिरिक्षक, श्री. जितेश पाटील पा.पु.अभियंता, श्री. श्रीकांत बि-हाडे विदयुत अभियंता, श्री. हितेश जोगी कर निर्धारण सेवा, श्री. राजेंद्र पाटील रोखपाल, श्री. लक्ष्मण पाटील लिपीक यांनी सदर अंदाजपत्रक तयार करणेसाठी परिश्रम घेतले.
Post a Comment