अमळनेर:- अतिक्रमित गाव नकाशावरील शिवार रस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेत तालुक्यातील पाच गावातील दहा रस्ते अतिक्रमण काढून मोकळे करण्यात आले.
पिंपळे खुर्द येथील साडे पाच किमी अंतराचे तीन शिवार रस्त्यावरील अतिक्रमण काढून मोकळे करण्यात आले. शिवार रस्ते मोकळे करण्याआधी झालेल्या बैठकीत सर्वच शेतकऱ्यांनी सहमती दर्शविल्याने शांततेत व सामंजस्याने हे शिवार रस्ते मोकळे करण्यात आले.
यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,अव्वल कारकून (रोहयो)ए.डी.परदेशी, भूमी अभिलेख विभागाचे ए.के.गिरी व एस.एम थोरात, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (रोहयो) किशोर बी. ठाकरे, तांत्रिक सहाय्यक (रोहयो)सचिन पाटील, सामाजिक पिंपळे बुद्रुक पिंपळे खुर्द व चिमनपुरी येथील सर्व ग्रामस्थ व सरपंच उपसरपंच सदस्य कार्यकर्ते युवराज पाटील तंटामुक्त अध्यक्ष निंबा चौधरी, पोलीस पाटील, सुदाम बळीराम पाटील, भैया बळीराम पाटील, नानाभाऊ हिलाल पाटील ,सुरेश नाना पाटील आधार राजाराम पाटील,संदीप पाटील रावसाहेब पाटील यांच्यासह सर्व शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्याने काम पूर्ण झाले.
Post a Comment