तालुका विधी सेवा समिती, एरंडोल येथे राष्ट्रीय लोकअदालतीत २२.४६ लाखांची तडजोड.

तालुका विधी सेवा समिती, एरंडोल येथे राष्ट्रीय लोकअदालतीत २२.४६ लाखांची तडजोड



एकूण ६२ प्रकरणे निकाली; तडजोडीत मोठी आर्थिक सुट.

एरंडोल:- तालुका विधी सेवा समितीच्या वतीने दि. २२ मार्च २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल २२,४६,४९४/- रुपयांच्या तडजोडी झाल्या. यामध्ये दाखलपूर्व २५ प्रकरणांत २१.४१ लाख तर न्यायालयात प्रलंबित असलेल्या ३७ प्रकरणांत १.०५ लाख रुपयांची तडजोड करण्यात आली.

सदर लोकअदालतीच्या उद्घाटन प्रसंगी श्री. ई.के. चौगले, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, एरंडोल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तसेच सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती बी. ए. तळेकर, पंच न्यायाधीश विधिज्ञ श्री. कैलास जी. भाटीया, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एम. एम. महाजन, सचिव अॅड. आकाश एन. महाजन यांसह विविध विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या दरम्यान न्यायमूर्ती ई.के. चौगले व अॅड. जयेश ए. पिलोर यांनी उपस्थितांना लोकअदालतीचे महत्त्व समजावून सांगत, तडजोडीच्या माध्यमातून न्यायप्रक्रिया वेगवान आणि प्रभावी कशी होते, यावर मार्गदर्शन केले. सामान्य नागरिकांना न्याय सहज, सुलभ आणि जलदगतीने मिळावा या उद्देशाने लोकअदालतींचे आयोजन केले जाते.

Post a Comment

Previous Post Next Post