शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी नेत्यांसोबत बैठक; १७ हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश निश्चित.
एरंडोल – तालुक्यातील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एरंडोल तालुका आणि शहरातील महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नुकतीच शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली, ज्यामध्ये जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल अध्यक्ष दादासाहेब ईश्वर पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि नगरसेवक दादासाहेब सुरेश पाटील, तसेच राष्ट्रवादी युवकचे राज्य सरचिटणीस किशोर पाटील खर्ची यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
या बैठकीदरम्यान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नव्याने प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यामध्ये राजू चौधरी, डॉ. प्रशांत पाटील, मुकुंद ठाकूर आदींनी विशेष सहभाग नोंदवला. लवकरच हे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि तालुकाध्यक्ष अमित पाटील यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे:
- राजेंद्र रामदास चौधरी
- दीपक लक्ष्मण पाटील (मालखेडा)
- मुकुंद भाऊ यादव ठाकूर (विखरण)
- डॉ. प्रशांत शांताराम पाटील
- भरत भिमसिंग पाटील (खर्ची)
- अनिल भगवान पाटील (खर्ची)
- जाकीर शेख नुरा (एरंडोल)
- निलेश दशरथ मिस्त्री (विखरण)
- महेंद्र रतन कुंभार (एरंडोल)
- शेख सत्तार (एरंडोल)
- शेख सोयब (कासोदा)
- शेख कलीम शेख सलीम (एरंडोल)
- अभयसिंग राठोड (खडका तांडा)
- मनोज शांताराम पाटील (रिंगणगाव)
- अरुण भाऊ पाटील (धूळ पिंपरी, पारोळा तालुका)
- कैलास लोभान नाईक (बामणे)
- जगदीश लक्ष्मण पाटील (मालखेडा)
राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल?
या पक्षांतरामुळे एरंडोल तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी (अजित पवार गट) अधिक बळकट होण्याची चिन्हे आहेत. आगामी निवडणुकांवर या घडामोडींचा काय प्रभाव पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Post a Comment