एरंडोल :- छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना सन्मानाने जगण्याची संधी स्वराज्यात उपलब्ध करून दिली या अनुषंगाने एरंडोल येथील आरोग्य दूत विक्की खोकरे व DM ग्रूप यांच्या तर्फे आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली.
शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जन्मलेल्या कन्या आणि त्यांचा मातांचा सन्मान म्हणून माजी नगराध्यक्ष दशरथ भाऊ महाजन याच्या हस्ते पुष्पगुच्छ व साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी स्वच्छता निरीक्षक जीवन जाधव, मराठा संघाचे आर डी पाटील, प्रसाद दंडवते , नितिन खोकरे, रितिक खोकरे, आदी उपस्थित होते शिवाजी महाराजांचा आदर्श जपा माँ जिजाऊनी शिवाजी महाराज घडविला शिवरायांचे कर्तुत्व डोळ्यासमोर ठेवून आपले ध्येय गाठा असे सुर मान्यवरांच्या मनोगतातून निघाला ,विक्की खोकरे यांचा या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
Post a Comment