पर्यावरणसेवेचे जिवंत उदाहरण!

उन्हाच्या तडाख्यातही हिरवाई जपणार "Little Valley"चे दानशूर अशोक पाटील सर!

कासोदा: यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र होणार असल्याची चिन्हे आहेत. वाढत्या तापमानामुळे कासोदा-एरंडोल रस्त्यावर लावलेल्या झाडांची देखभाल मोठे आव्हान ठरणार आहे. दर महिन्याला किमान पाच वेळा पाणी देणे आवश्यक असून, पुढील तीन महिने झाडे जगवणे अत्यंत कठीण ठरणार आहे.

Little Valley

पर्यावरणप्रेमींच्या या चिंतेला प्रतिसाद देत, Little Valley चे दानशूर अशोक पाटील सर पुढे आले आहेत. "या झाडांना पाण्याअभावी कोमेजू देणार नाही!" असा दृढ निश्चय करत त्यांनी पुढील तीन महिन्यांसाठी संपूर्ण पाण्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे.

सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श!

अशोक पाटील सर जळगावमध्ये राहतात, मात्र त्यांची शिक्षण संस्था कासोद्यात आहे. या शाळेच्या निमित्ताने त्यांची कासोद्याशी भावनिक नाळ जुळली आहे. परिसरातील हिरवाई टिकवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत, स्वतःहून झाडांना पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्विकारली आहे.

संकटात धावून येणारे हातच खरी माणुसकी जपतात!

उन्हाच्या तीव्रतेमुळे झाडे कोमेजण्याची भीती असताना, अशोक पाटील सरांनी दिलेल्या मदतीमुळे परिसरातील पर्यावरणप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. समाजासाठी ते एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत.

         "निसर्ग जगला, तरच आपण जगू!"


Post a Comment

Previous Post Next Post