श्री दादाजी धुनिवाले दरबार सांगवी येथे फराळाचे वाटप.

पारोळा - तालुक्यातील सांगवी येथील तीर्थक्षेत्र असलेले श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने आरोग्य दूत विक्की खोकरे व दादाजी भक्त परीवार पाचोरा यांच्या तर्फे भाविक भक्तांना साबुदाणा फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले.

श्री दादाजी धुनिवाले दरबार  सांगवी येथे फराळाचे वाटप

श्री दादाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदिप पाटील सांगवी सरपंच भैय्या पाटील आरोग्य दूत विक्की खोकरे याच्यां हस्ते भाविक भक्तांना साबुदाणा वडा व खिचडी वाटप करण्यात आले.

सांगवी येथे श्री दादाजी धुनिवाले यांचे भव्यदिव्य मंदिर असून तिथे गुरु माऊली श्री सेवानंदजी महाराज यांची समाधी असल्याने तिथे हजारो भक्त दर्शनासाठी नेहमी येत असतात. यावेळी शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला साबुदाणा खिचडी वाटप प्रसंगी विश्वस्त छोटु बडगुजर, राजु पाटील, फकिरा खोकरे, छोटु पाटील (उ.म.वी )दिपक वाघ, रमेश चौधरी, भाऊसाहेब पाटील , रमेश वाघ, दिपक पाटील, संजय पाटील, भगवान पाटील, वाल्मिक राजपूत, युवराज पाटील,संदिप राजपुत, दादाभाऊ पाटील, आदी उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post