सिद्धेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा उत्साही गेट-टुगेदर – “सोहळा मैत्रीचा” रंगला.

प्रतिनिधी - पिंपळकोठा येथील सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयातील २००८ - २००९ च्या बॅचचे विद्यार्थी विद्यार्थिनीचा "सोहळा मैत्रीचा" असा गेट टु गेदर साजरा करण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानी पी.बी.पाटील सर होते. व्यासपीठावर बी.एफ.पाटील , सौ. सी. एन. पाटील आदी उपस्थित होते.

सिद्धेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा उत्साही गेट-टुगेदर – “सोहळा मैत्रीचा” रंगला

   शाळेची स्थापना १९९३ पासून झाल्यानंतर प्रथमच गेट टु गेदर कार्यक्रम साजरा करण्यात आल्याने सर्व शिक्षकांचा ऊर भरून आला होता. शिक्षकांना आपण दिलेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थीनी चांगला केल्याने चेहर्यावर समाधानाचे भाव दिसत होते. सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सरकारी नोकरीत , अधिकारी , शेतकरी , समाजसेवक असे घडलेले सर्व एकत्र आले होते. परंतु त्या दिवशी सर्वांना बालपण आठवत होते. 

    या प्रसंगी कृष्णा सोनार, कमलेश पाटील, प्रमोद पाटील , ज्ञानेश्वर पाटील , रवींद्र पाटील महेश पाटील , मंगल सिंग राजपूत , जयेश बडगुजर , प्रतिभा सोनवणे , रिंकू चौधरी , रूपाली पाटील , नूतन पाटील , समाधान पाटील यांनी गेट-टुगेदर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post