शिवरायांच्या गाथेने भारावली शास्त्री फार्मसीची सभागृह - पोवाडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

पळसदळ (एरंडोल), १९ फेब्रुवारी २०२५: शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला, आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवडक पंधरा स्पर्धकांना महाविद्यालयात सादरीकरणाची संधी मिळाली.

शिवरायांच्या गाथेने भारावली शास्त्री फार्मसीची सभागृह - पोवाडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

कार्यक्रमास एरंडोल मतदारसंघाचे आमदार दादासो अमोल चिमणरावजी पाटील, युवासेनेचे जिल्हा प्रमुख मनोज दादा पाटील (पेहलवान), डी. डी. एस. पी. महाविद्यालयाचे अध्यक्ष दादासो अमित पाटील, माजी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी, तसेच माजी नगरसेवक डॉ. सुरेश दादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाआरतीने झाली.

Shirid

शिवरायांच्या गाथेने भारावली शास्त्री फार्मसीची सभागृह - पोवाडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

शिवरायांच्या गाथेने भारावली शास्त्री फार्मसीची सभागृह - पोवाडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

स्पर्धेतील विजेते:

✅ प्रथम क्रमांक: महेश सपकाळे (म. गांधी कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, यावल) – ₹५००१ + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

✅ द्वितीय क्रमांक: अनिकेत तुपे (शासकीय फार्मसी महाविद्यालय, जळगाव) – ₹३००१ + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

✅ तृतीय क्रमांक: कल्याणी बोरसे (आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालय, शिरपूर) – ₹२००१ + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

याशिवाय खेमचंद पाटील (शास्त्री महाविद्यालय), ऐश्वर्या पाटील (बालविश्व इंग्लिश मिडीयम शाळा, जळगाव) आणि विधी पाटील (सेंट मेरी पब्लिक स्कूल, टोळी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांचे विचार:

▪️ आमदार दादासो अमोल चिमणरावजी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विद्यार्थ्यांनी स्वीकारावा, तसेच ‘श्रीमान योगी’ (रणजीत देसाई) हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असा संदेश दिला.

▪️ प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी महाराजांची शिस्तबद्धता व कर्तव्यनिष्ठा विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या मा. सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा शिवदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. योगेश्वरी लोहार यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, प्रा. जावेद शेख, प्रा. मंगेश पाटील आणि प्रा. राहुल बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले.




Post a Comment

Previous Post Next Post