एरंडोल तालुका काँग्रेस ओबीसी सेलची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
एरंडोल :- येथे तालुका काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने नवीन शिधापत्रिका त्वरीत वितरित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात आले. मागील सहा महिन्यांपासून शिधापत्रिका मिळत नसल्याने अनेक नागरिक अडचणीत सापडले आहेत.
या निवेदनात 12 अंकी शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांना धान्य मिळावे आणि नवीन शिधापत्रिका त्वरित वितरित कराव्यात, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देताना तालुका काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष मुकुंद ठाकूर, तसेच शेख सांडू यांच्यासह पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या मागणीवर प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
Post a Comment