शास्त्री फार्मसी महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा जल्लोष, प्रतिभेचे रंग आणि सन्मानाचे क्षण.
एरंडोल (ता. ५ एप्रिल): शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री फार्मसी महाविद्यालयात “युफोरिया 2k25” या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य आणि शानदार उत्सव जल्लोषात पार पडला. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, माजी विद्यार्थी मेळावा, पुरस्कार वितरण अशा विविध उपक्रमांनी सजलेल्या या सप्ताहभर चाललेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली कला, प्रतिभा आणि उत्साहाने उपस्थितांची मने जिंकली.
दीप प्रज्वलन व श्रीगणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे महाराष्ट्र राज्य महामंत्री भाऊसो. किशोरजी काळकर, माजी जि.प. सदस्य दादासो प्रतापराव पाटील, प्रादेशिक तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव श्री. देवेंद्र दंडगव्हाळ, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक प्रा. राजेंद्र पाटील, संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, संस्थापक सचिव सौ. रूपा शास्त्री आणि उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शैक्षणिक घडामोडींमध्येच नव्हे, तर सर्वांगीण विकासातही यशस्वी व्हा – किशोरजी काळकर यांचे आवाहन.
अध्यक्षीय भाषणात किशोरजी काळकर यांनी विद्यार्थ्यांना केवळ गुणपत्रिकेपुरते मर्यादित न राहता, कला, क्रीडा, नेतृत्वगुण यांसह सर्व क्षेत्रांमध्ये निपुण होण्याचे महत्व पटवून दिले.
गौरवाचा क्षण: पुरस्कार वितरण...
या प्रसंगी महाविद्यालयात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
बी. फार्म मधील उत्कृष्ट विद्यार्थी: संकेत ठोसर
उत्कृष्ट विद्यार्थिनी: दिव्या पाटील
डी. फार्म मधील उत्कृष्ट विद्यार्थी: प्रशांत अहिरे
उत्कृष्ट विद्यार्थिनी: सृष्टी तायडे
बी. फार्ममधील उत्कृष्ट प्राध्यापक: प्रा. अनिता पावरा
डी. फार्ममधील उत्कृष्ट प्राध्यापक: कीर्ती पाटील
उभरते प्राध्यापक: प्रा. मंगेश पाटील
उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी: दिवाकर पाटील व प्रशांत निळे
क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे बहारदार आयोजन.
1 एप्रिलपासून सुरू झालेल्या सप्ताहभराच्या स्नेहसंमेलनात क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, चेस, कॅरम यांसारख्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळाला. सांस्कृतिक कार्यक्रमांत नृत्य, नाट्य, गायन, फॅशन शो आणि ग्रुप डान्स यांसारख्या रंगारंग कार्यक्रमांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले.
माजी विद्यार्थी मेळाव्यात जुन्या आठवणींचा ठेवा.
माजी विद्यार्थी मेळाव्यात जुन्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या आठवणींना उजाळा देत सध्याच्या विद्यार्थ्यांसोबत आपले अनुभव शेअर केले. विद्यार्थ्यांसाठी हे प्रेरणादायी ठरले.
यशस्वी आयोजना मागे कार्यरत टीमचे योगदान..
कार्यक्रमाचे अचूक सूत्रसंचालन प्रा. मंगेश पाटील यांनी केले, तर आयोजनाची मदार प्रा. राहुल बोरसे यांनी उत्तमपणे सांभाळली. मयुरी पाटील, राजेश्वर पाटील, संकेत ठोसर आणि सुश्मिता लोहार या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रा. जावेद शेख यांनी आभार प्रदर्शन केले.
मान्यवरांची विशेष उपस्थिती आणि मार्गदर्शन.
कार्यक्रमाला दादासो. अमोल चिमणराव पाटील (आमदार) यांनी विशेष भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच श्री. धनराज गोपाल कासट (संचालक, सुगोकी हॉटेल) यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत “युफोरिया 2k25” ला अविस्मरणीय ठरवल्याचे सांगितले.
Post a Comment