कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालय, पिंपळे बु. येथे महिला दिन उत्साहात साजरा.
पिंपळे बु. – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शिरसाठ मॅडम यांना एका दिवसासाठी मुख्याध्यापक पदाचा मान देऊन गौरविण्यात आले. तसेच, शिक्षिका श्रीमती गुमणार मॅडम यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पिंपळे बु. माजी सरपंच सौ. ढगूबाई भीमराव पाटील, विद्यमान सरपंच सौ. अपेक्षा राहुल पाटील, तसेच पिंपळे खु. प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील यांच्यासह माजी महिला सरपंच आणि स्वयंपाक मदतनीस उषाबाई भिकन सोनवणे, सरुबाई संतोष न्हावी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय भोसले सर होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री. सी. एन. पाटील, श्री. डी. बी. पाटील आणि विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील माता-भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. बी. पाटील यांनी केले.
Post a Comment