"आमदार अनिल पाटील यांच्या मंत्रीपदासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मंगळग्रह देवाला साकडे!"

"आमदार अनिल पाटील यांच्या मंत्रीपदासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मंगळग्रह देवाला साकडे!"

अमळनेर
-महायुती सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवार, 3 रोजी राजीनामा दिल्याने खान्देशमध्ये पक्षाच्या गोटातून माजी कॅबिनेट मंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल पाटील यांना मंत्री पदाचा मुकुट पुन्हा बहाल होईल,अशी चर्चा सर्वत्र असताना याच मंत्रीपदासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळग्रह मंदिरात जाऊन मंगळग्रह देवाला साकडे घातले.
"आमदार अनिल पाटील यांच्या मंत्रीपदासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मंगळग्रह देवाला साकडे!"

        अमळनेर विधानसभा मतदार संघातून अजितदादा पवार गटाचे उमेदवार तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील हे विजयी झाल्यानंतर त्यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले नव्हते,मात्र मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे आता पुन्हा एकदा अनिल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात दिसतील अशी शक्यता वर्तविली जात असल्याने अमळनेरात राष्ट्रवादीमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

      अशातच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अमळनेरच्या पदाधिकाऱ्यांनी अनिल पाटील पुन्हा मंत्री व्हावे म्हणून मंगळ ग्रह मंदिर येथे जाऊन मंगळदेवाला साकडे घातले.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सनी गायकवाड, तालुकाध्यक्ष यशोदीप पाटील, शहराध्यक्ष कृष्णा बोरसे, शहर कार्यध्यक्ष मनीष देसले, तालुका उपाध्यक्ष प्रणव चौधरी, शहरसचिव प्रेम मोरे, कुणाल पाटील,जयेश महाजन, रोहित शिसोदे, कुणाल शिंगाणे, उदय पाटील,आदित्य संदानशीव, चेतन पाटील, शामकांत पाटील ,देव गोसावी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post