एमआयडीसी पोलिसांची दमदार कारवाई: २४ तासांत दोन घरफोड्यांचा छडा, तीन आरोपी जेरबंद!

एमआयडीसी पोलिसांची दमदार कारवाई: २४ तासांत दोन घरफोड्यांचा छडा, तीन आरोपी जेरबंद!

लाखोंचा मुद्देमाल हस्तगत,सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना अटक.

जळगाव:- शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या घरफोडींचा छडा लावून तिघा आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका सराईत गुन्हेगारासह एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पहिला गुन्हा: लग्नासाठी राजस्थानला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी सावित्रीनगर येथील सुरेश हिराराम सोलंकी यांच्या घरात चोरी झाली. सोलंकी कुटुंब राजस्थानमध्ये एका लग्नसमारंभासाठी गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

या घरफोडीत चोरट्यांनी

✅ १.६० लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तू

✅ ४०,००० रुपये रोख रक्कम

असा एकूण २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.

तक्रार दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुन्हे शोध पथकाने ५१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, या चोरीत सराईत गुन्हेगार विशाल मुरलीधर दाभाडे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले असता, तो मध्यप्रदेशातील श्री ओंकारेश्वर येथे एका लॉजमध्ये लपल्याचे आढळले. विशेष मोहिम राबवून पोलिसांनी त्याला तिथून ताब्यात घेतले.गुन्ह्यात दुसऱ्या आरोपीचाही सहभाग – पोलिसांची दुसरी मोठी अटक चौकशीत विशालने दीपक राजू पाटील (रा. तांबापुर, जळगाव) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी मुक्ताईनगर येथे जाऊन दीपक पाटीललाही अटक केली.

त्यांच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल:

१.१५ लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तू गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल रोख रक्कम.

 दुसरा गुन्हा: अल्पवयीन आरोपीकडून घरफोडी. पोलिसांनी संपूर्ण रक्कम हस्तगत केली दुसऱ्या घटनेत, गणेशपुरी मेहरुण, जळगाव येथील मोहसीन खान अजमल खान यांच्या घरात चोरी झाली. अज्ञात चोरट्याने २३,३०० रुपये रोख रक्कम चोरून नेली.तपासा दरम्यान पोलिसांना मास्टर कॉलनीतील एका विधीसंघर्ष बालकावर (अल्पवयीन आरोपी) संशय होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली.

पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शन, तपास पथकाचे कौतुक!या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी तपास करणारे अधिकारी व कर्मचारी:

गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक संदीप पाटीलपोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे व इतर सहकारी अधिकारी व कर्मचारी एमआयडीसी पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी तपासामुळे शहरातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.






Post a Comment

Previous Post Next Post