शेकडो श्रीसदस्यांचा सहभाग, १० टन कचऱ्याची विल्हेवाट, शहराच्या स्वच्छतेसाठी मोठे योगदान.
![]() |
एरंडोल :- महाराष्ट्र भूषण डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड यांच्या सौजन्याने पद्मश्री भूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून*स्वच्छता ही सेवा* या उद्देशाने ०१ मार्च नानासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून आज दि. ०२ मार्च २०२५ रोजी एरंडोल तालुक्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या उपक्रमात तब्बल ३९२ श्रीसदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि शहर स्वच्छतेसाठी मोलाचे योगदान दिले.
१० टन कचऱ्याची विल्हेवाट – शहर स्वच्छतेसाठी मोठी मोहीम.
या अभियानादरम्यान १० ट्रॅक्टर, १ टेम्पो आणि २ छोटा हत्ती वाहनांच्या सहाय्याने तब्बल १० टन कचरा गोळा करण्यात आला. त्यामध्ये १ टन ओला कचरा आणि ९ टन सुका कचरा संकलित झाला. जमा झालेला कचरा नियमानुसार डंपिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्यात आला.
शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता कार्य.
ही मोहीम शहरातील मुख्य रस्ते, धरणगाव रोड, बचपन स्कूल, जुना धरणगाव रोड, कासोद रोड आणि आसपासच्या परिसरात राबवण्यात आली. श्रीसदस्यांनी या ठिकाणी स्वच्छता करत प्लास्टिक, कचरा आणि घाण हटवली.
माजी नगराध्यक्ष रमेशभाऊ परदेशी यांच्या हस्ते उद्घाटन.
या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ एरंडोल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब रमेशभाऊ परदेशी यांच्या हस्ते राः तिः काबरे शाळेजवळ करण्यात आला. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत चाललेल्या या अभियानात मोठ्या संख्येने श्रीसदस्यांनी भाग घेतला.
स्वच्छतेचे महत्त्व – प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन.
स्वच्छता अभियानाच्या समारोपावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी शहराच्या स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट केले तसेच श्रीसदस्यांच्या कार्याचे कौतुक केले. या उपक्रमाने शहर स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली.
स्थानिक नागरिक आणि श्रीसदस्यांचे योगदान.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीबैठक आडगाव, एरंडोल, कासोद, खडके, भातखेडा, टोळी, रिंगणागाव आणि तळई पिंप्री येथील श्रीसदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी आहे, याच विचारातून तिर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण पुढील काळातही अशाच उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे सांगण्यात आले.
"स्वच्छ भारत, सुंदर भारत" या ध्येयाने प्रेरित हा उपक्रम एरंडोल शहराच्या स्वच्छतेसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
-
Post a Comment