महात्मा फुले यांचे सत्यशोधकी विचार देशासाठी प्रेरणादायी - सत्यशोधक दशरथ महाजन ( माजी नगराध्यक्ष )
जाधव कुटुंबीयांचा क्रांतिकारी निर्णय - पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )
प्रतिनिधी -धरणगांव /एरंडोल - शहरातील महात्मा फुले स्मारकाजवळ माळीवाडा येथे जाधव कुटुंबीयांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रेरणेने सौ.रंजना व भाऊसाहेब ( बापु ) माधव महाजन यांचा मुलगा सत्यशोधक अमोल व सत्यशोधिका वंदना यांचा सत्यशोधक विवाह सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांनी दि.२५ फेब्रुवारी, २०२५ मंगळवार रोजी मोठ्या थाटामाटात लावला. सर्वप्रथम खंडेरायाची तळी भरून विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. वधू-वर, आई-वडील व मामा-मामी यांच्या शुभहस्ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, आधुनिक भारताचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक शाहूजी महाराज व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून एरंडोल नगरीचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, पत्रकार निलेश पवार, तालुकाध्यक्ष हिलाल महाजन, अनिल महाजन, दिनेश महाजन, जिल्हा सचिव कविराज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद महाजन यासह एरंडोल तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर व सत्यशोधक कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विवाह प्रमाणपत्र देण्यात आले.
सत्यशोधक विवाहप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी सत्यशोधक समाजाची भूमिका मांडून राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे कार्य विशद करून अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर रहा असा संदेश दिला. सत्यशोधक दशरथ महाजन व आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी महापुरुषांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या विचारांवर चालणे ही काळाची गरज आहे व जास्तीत जास्त सत्यशोधक विवाह लावुन भटमुक्त व्हावे असे प्रतिपादन केले. विवाह सोहळ्याचे सूत्रसंचलन व आभार भडगांव येथील सत्यशोधक कार्यकर्ते प्रविण महाजन सर यांनी केले.सत्यशोधक विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment