त्रिमूर्ती शिवजयंती महाशिवरात्री महोत्सव: ऐतिहासिक अमरनाथ शिवलिंग गुफा दर्शनाचा सुवर्णयोग.

एरंडोल (जळगाव): ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरेने समृद्ध असलेल्या एरंडोल शहरात प्रथमच त्रिमूर्ती शिवजयंती आणि महाशिवरात्री निमित्त भव्य अमरनाथ शिवलिंग गुफा दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा ब्रह्माकुमारींच्या वतीने आत्मानुभूती भवन, एरंडोल येथे पार पडणार आहे.

त्रिमूर्ती शिवजयंती महाशिवरात्री महोत्सव: ऐतिहासिक अमरनाथ शिवलिंग गुफा दर्शनाचा सुवर्णयोग

शिवभक्तांसाठी विशेष आकर्षण असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी आमदार चिमणरावजी रुपचंद पाटील यांच्या हस्ते शिवध्वजरोहण संपन्न होईल.

दर्शनासाठी वेळ:

२५, २६ व २७ फेब्रुवारी २०२५

सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत

या विशेष सोहळ्यात राजयोगिनी मिना दीदी (अध्यक्ष, विदेषिक, जळगाव) या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवभक्तांसाठी महाआरती सकाळी ८ व संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.

सर्व शिवभक्तांनी या ऐतिहासिक आणि भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या महोत्सवात सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालया तर्फे करण्यात आले आहे.


ठिकाण: आत्मानुभूती भवन, तनिष्का  पॅट्रोल पंपाच्या मागे, धरणगाव रोड, एरंडोल

संपर्क: 9834082713, 9096949540



Post a Comment

Previous Post Next Post