शेतकरी - कष्टकऱ्यांचा राजा शिवछत्रपती - शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील.
धरणगाव प्रतिनिधी - शहरातील कृष्ण गीता नगर येथे छत्रपती शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कॉलनीतील सर्व मुला मुलींनी महापुरुष व महामातांच्या वेशभूषा साकारल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद विसपुते यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक जे एस पवार होते प्रमुख अतिथी म्हणून शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील, माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कॉलनीतील अर्पिता धनगर हिने राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व संकेत पाटील यांनी बाल शिवराय यांची वेशभूषा साकारली होती. दक्ष मिस्तरी, श्रेयस पवार, रितेश मिस्तरी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री तर इशिता कोळी, अदिती कोळी, रीशिता बन्सी, तनिष्का सैनी, आराध्या न्हावी, चैताली न्हावी, दृष्टी कुलट, दिशा कुलट, लावण्या पवार या मुलींनी माँसाहेब जिजाऊ, महाराणी ताराराणी, अहिल्यामाई होळकर, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, माता रमाई, फातिमाबी शेख, राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा साकारली होती.
शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी शिवचरित्र उलगडून शिवरायांच्या विचार भारतासाठी नव्हे तर जगासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या विचारांवर चालणे गरजेचे आहे. शिवजयंती नाचून नव्हे तर प्रबोधनातून साजरी झाली पाहिजे असे म्हणत कृष्ण गीता नगरवासीयांचे अभिनंदन केले. 18 पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करून परस्त्रीला मातेसमान मानले, शेतकरी - कष्टकऱ्यांचे रयतेचे राज्य निर्माण करणारा अद्वितीय राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होय. शिवजयंतीचे खरे जनक सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले आहेत असे प्रतिपादन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी शिवरायांचे थोर विचार सांगुन उदाहरण दाखले दिलेत. याप्रसंगी कॉलनीचे अध्यक्ष बी एम सैंदाणे, उपाध्यक्ष विनायक न्हावी, सचिव महेंद्र सैनी, तसेच सर्व कॉलनिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन पी डी पाटील तर आभार ज्ञानेश्वर पवार यांनी मानले.
Post a Comment