एरंडोल: नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता दूत यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.कार्यालयीन अधीक्षक विनोद पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल बागुल यांच्या संकल्पनेतून सर्व कर्मचाऱ्यांना मानाचे फेटे परिधान करण्याचा सन्मान देण्यात आला.
मोटारसायकल रॅलीद्वारे अभिवादन.
यावेळी स्वच्छता दूतांनी मोटारसायकल रॅली काढून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान एकलव्य यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भगवे फेटे परिधान केलेले आणि शिवरायांचा जयघोष करणारे स्वच्छता दूत हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
उत्सवाला उपस्थित मान्यवर आणि स्वच्छता दूत.
यावेळी स्वच्छता निरीक्षक जीवन जाधव, आरोग्य दूत विकी खोकरे, किशोर महाजन, दिपक गोसावी, रघुनाथ महाजन, संदीप शिंपी, विनोदी जोशी, प्रकाश सुर्यवंशी, राजू वंजारी, सुनील धोबी, मनोज खोकरे, सुकलाल पाटील, अनिकेत पवार, रितीक खोकरे, लखन गेचंद, भरत लोंढे, भरत महाजन, गणेश गोंडाले, निखिल खोकरे, योगेश सपकाळे, संतोष खोकरे, मनोहर आठवाल आणि राहुल आठवाल आदी स्वच्छता दूत उपस्थित होते.
Post a Comment