जळगाव– एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये झालेल्या चोरीचा छडा लावत एमआयडीसी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला असून, आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चोरीच्या घटनांचा तपास कसा लागला?
एमआयडीसी परिसरातील साई प्रेरणा इंडस्ट्रीज आणि महाकाल मुनी कंपनी या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य चोरीला गेले होते. साई प्रेरणा इंडस्ट्रीजमधून 3,03,000 रुपयांचे साहित्य, तर महाकाल मुनी कंपनीतून 50,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.
तपासा दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संदीप गायकवाड आणि मोहसिन मुजावर यांच्यावर संशय बळावला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोघांना ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.
हस्तगत मुद्देमाल आणि पुढील तपास...
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 1,11,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे एमआयडीसी परिसरातील उद्योगपतींमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष योगदान...
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अजय नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत होते.
Post a Comment