एरंडोल (27 फेब्रुवारी 2025): शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल येथे मराठी भाषा गौरव दिन 2025 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे उद्घाटन.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री आणि संस्थेच्या सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषेच्या जतनासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
या कार्यक्रमात मराठी निबंध स्पर्धा, कविता वाचन, संवाद सत्र यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी मराठी भाषेचा प्रभावी वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले.
मराठी भाषेच्या संवर्धनाची शपथ.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक श्री. जावेद शेख यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी मराठी भाषा संवर्धनाची शपथ घेत मराठीचा अभिमान बाळगण्याचा संकल्प केला.
Post a Comment