एरंडोल, 02 मार्च 2025:रोजी शहरातील सर्व बौद्ध समाज बांधवांची सहविचार सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती व उपनगराध्यक्ष आयु. शालिकग्राम गायकवाड हे होते. सालाबादाप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चर्चा केली आणि समाजाच्या प्रगतीसाठी नव्या उपक्रमांची आखणी करण्यात आली. समाज एकत्र येऊन कार्यरत राहावा, यासाठी प्रभावी नेतृत्वाची निवड केली गेली.
नवनियुक्त पदाधिकारी:
➡ अध्यक्ष: आयु.बनसोडे लखन पुरुषोत्तम
➡ उपाध्यक्ष:आयु बोरसे नितीन तुळशीराम
➡ उपाध्यक्ष:आयु.चौधरी गणेश दत्तात्रय
➡ सचिव:आयु.सोनवणे अविनाश सतीश
➡ खजिनदार:आयु.गायकवाड संघरत्न शालिग्राम
➡ सहखजिनदार:-आयु.अहिरे आकाश दिपक
या सभेत समाजाच्या एकजुटीवर भर देत, बौद्ध समाजाच्या विविध उपक्रमांना गती देण्याचा निर्धार करण्यात आला. आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भव्यदिव्य स्वरूपात साजरी करण्यासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे.
सभेत अनेक मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजहिताचे निर्णय घेऊन, एकत्र येऊन कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
Post a Comment