तोरणा:- शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित किल्ले तोरणा येथे हिंदवी स्वराज्याचे तोरण उत्सव ऐतिहासिक विजय दिवस सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तरी शिवशंभूभक्तांनी स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी व हिंदवी स्वराज्याचा पहिला विजय दिवस साजरा करण्यासाठी शेकडो शिवभक्तांनी सहभाग घेतला प्रमुख पाहुणे श्री तानाजी मालुसरे ( नरवीर सुभेदार ) यांचे 13 वंशज मा. श्री कुणाल दादा मालुसरे आणि श्री येसाजी कंक ( सरसेनापती ) यांचे वंशज मा. श्री राजेंद्रभाऊ रामभाऊ कंक आणि शिवशंभु संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री महादेव दादा पवार यांचा हातून श्री जितेंद्र पाटील यांना आरोग्य क्षेत्रात उलखनीय कार्य केल्याबद्दल “”आरोग्यदूत सेवारत्न पुरस्कार “” देऊन सामाणित करण्यात आले
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांना जिजाऊ माता, छत्रपती शिवाजी महाराज ,श्री शंभूराजे यांचे पूजन करून पालखी चा मान भेटला. ..
आपण समाजाचे आणि राष्ट्राचे एक जबाबदार घटक असुन समाज ऋण व राष्ट्र ऋण फेडण्याचे महनीय कार्य करीत आहात. आपल्या कार्य कर्तुत्वद्वारे सदैव राष्ट्राभिमान जागृत व्हावा व ज्ञानवृद्धी होऊन देशाला प्रगतीपथाकडे नेण्यास आपले योगदान सदैव लाभावे, अशा भावना मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आल्या.
सामाजिक क्षेत्रातील अतिशय उत्तम अशा कामगिरीसाठी व सेवा परमो धर्म हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून जनसेवा हीच ईश्वरसेवा याचे समाजासमोर मुर्तिमंत उदाहरण असल्याचे आपल्या कार्याने दाखवुन दिल्याने सदर पुरस्कारासाठी आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींकडुंन जितेंद्र पाटील यांचे नाव सुचविण्यात आले होते.
कोरोनाव्हायरस सारख्या संसर्ग आजारामुळे जनता भयभीत झालेले असतांना अशा संकटसमयी मोफत जेवण उपलब्ध करून देणे, धान्य, शिधा व गरजेच्या वस्तु मोफत वाटप करणे,
रक्तदान व मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करणे, अतिशय अल्प दरात रुग्णवाहिका सेवा ऊपलब्ध करून देणे, अनाथ आश्रमामधिल मुलांना दैनंदिन लागणारे साहित्य व जेवण पुरविणे,अपंगांना जयपूर फूट, कॅलिपर सायकल वाटप करणे.आणि यासारख्या विविध उल्लेखनीय कामगिरीसाठी जितेंद्र पाटील यांना आत्तापर्यंत 5 आंतरराष्ट्रीय आणि 151 राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेले आहे.सदर पुरस्कार जितेंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आल्याने उत्तम कार्य करणाऱ्या व योग्य व्यक्तीला देण्यात आल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
_________________________
Post a Comment