एरंडोलमध्ये आमदार अमोलदादा पाटील यांचा राजकीय मास्टरस्ट्रोक – शिवसेना (उबाठा) ला जोरदार धक्का!

एरंडोलमध्ये आमदार अमोलदादा पाटील यांचा राजकीय मास्टरस्ट्रोक – शिवसेना (उबाठा) ला जोरदार धक्का!

शिवसेना (उबाठा) चे माजी नगरसेवक, युवासेनेचे पदाधिकारी आणि ४० हून अधिक कार्यकर्त्यांचा मोठा इनकमिंग – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न!

एरंडोल:- विधानसभा निवडणुकीनंतर एरंडोलच्या राजकीय पटावर मोठी उलथापालथ झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत आमदार अमोलदादा पाटील यांनी शिवसेना (उबाठा) ला मोठा धक्का देत पक्षाच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.काल मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख मा. ना. एकनाथ शिंदे व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एरंडोल येथील शिवसेना (उबाठा) च्या माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला.

ही प्रमुख नेते झाले शिवसैनिक...

माजी आमदार चिमणरावजी पाटील व आमदार अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना (उबाठा) चे माजी नगरसेवक रुपेश माळी, युवासेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन, युवासेना उपतालुकाप्रमुख अनिल महाजन, युवासेना शहर संघटक नितीन महाजन, युवासेना वैद्यकीय आघाडी शहर प्रमुख राजेश महाजन, सामाजिक कार्यकर्ते राहुल माळी, भरत महाजन, पंकज नेरकर, निहार भेलसेकर, अनिल महाजन, नाना वाणी, संजय महाजन, हिलाल माळी यांच्या सह तब्बल ४० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत आणि पक्षविस्ताराचा निर्धार...प्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून शिवसेना संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.

आमदार अमोलदादा पाटील यांचा मोठा दावा..

या ऐतिहासिक पक्षप्रवेशानंतर बोलताना आमदार अमोलदादा पाटील म्हणाले,"हे केवळ सुरुवात आहे! आगामी काळात असे अनेक धक्के विरोधकांना बसणार आहेत. मतदारसंघाचा विकास आणि पक्षसंघटन बळकट करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे."राजकीय वर्तुळात चर्चा रंगली या प्रवेशामुळे एरंडोलमधील राजकीय समीकरणे बदलली असून आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे दिसत आहे.

शिवसेना (उबाठा) साठी मोठा धक्का!

या पक्षप्रवेशामुळे विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण असून शिवसेना (उबाठा) साठी हा मोठा धक्का मानला जात आहे.राजकीय भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा:या राजकीय घडामोडीमुळे एरंडोलमध्ये आगामी निवडणुकीत शिवसेनेचा (शिंदे गट) प्रभाव वाढणार की विरोधक या परिस्थितीला कसे सामोरे जातील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post