शिव उद्योग संघटनेच्या माध्यमातून रोजगार आणि बाजारपेठ उपलब्ध.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) – महाराष्ट्रातील बचत गट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शिव उद्योग संघटना कार्यरत आहे.उद्योग वाढीसाठी योग्य विक्री आणि प्रभावी मार्केटिंग तंत्र आवश्यक असते. मात्र, अनेक उद्योजक मर्यादित बजेट आणि योग्य मार्गदर्शनाअभावी व्यवसाय वाढवू शकत नाहीत.
ही समस्या सोडवण्यासाठी शिव उद्योग संघटना महाराष्ट्रभर "रिसेल करणाऱ्या महिलांची टीम" उभारत आहे. महिलांना कमी गुंतवणुकीत स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे.
महिलांसाठी स्वयंरोजगाराची अनोखी संधी
रिसेलर म्हणून कमिशनवर काम करण्याची संधी
स्वतःची रिसेलिंग टीम उभारण्याची संधी
इच्छुक महिलांनी दीपक विठ्ठल काळीद – 9820317150 यांच्याशी संपर्क साधावा.
ही सुवर्णसंधी मराठी उद्योजक आणि महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला करणारी आहे. तुमच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळवा आणि स्वतःचा व्यवसाय वाढवा!
Post a Comment