धरणगाव शहरात सत्यशोधकास जयंतीदिनी विनम्र अभिवादन !...

 

राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांचे विचार आचरणात आणणे हीच खरी तात्यासाहेबांना आदरांजली !... - विठोबा महाजन 


धरणगाव प्रतिनिधी - पी डी पाटील सर


धरणगांव - शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ११ एप्रिल भारतातील थोर समाज सुधारक, विचारवंत, शिक्षणतज्ञ, क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

धरणगाव शहरात सत्यशोधकास जयंतीदिनी विनम्र अभिवादन !...


         रॅली ची सुरुवात मोठा माळीवाडा येथील माळी समाज मढी येथून सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम सर्व धरणगाव शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रॅली फुलहार गल्ली, जांजीबुवा चौक, बालाजी मंदिराकडून धरणी चौकात आली. येथे तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकाला माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, लहान माळीवाडा समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन तसेच सर्व शहरातील राजकीय, सामाजिक , शैक्षणिक, पत्रकारिता, क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. यानंतर कोट बाजार पुढे लहान माळीवाडा पाटील समाज मढी व माळी समाज मढी कडून गबानंद चौक यानंतर गौतम नगर व शेवटी संजय नगर येथे महात्मा फुले चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

       

धरणगाव शहरात सत्यशोधकास जयंतीदिनी विनम्र अभिवादन !...

 समारोपाप्रसंगी रॅलीला उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय, संत सावता महाराज, महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आचरणात आणणे हीच खरी तात्यासाहेबांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी यांनी मानले.

        जयंती उत्सव यशस्वीतेसाठी पोलीस प्रशासनातील बंधु -भगिनी व गावातील सर्व तरुण युवकांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post